Marriage Tips

मुला-मुलींना लग्नासाठी जोडीदार शोधताना महाराष्ट्रातील पालकांना मोठ्या अडचणी

महाराष्ट्राच्या अनेक घरांमध्ये एक मोठं संकट उभे आहे. मराठी समाजातले पालक, त्यांच्या प्रौढ मुलांची लग्न ठरवण्याच्या बाबतीत मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत.

Sachin Khot
March 2, 2026
3 min read
मुला-मुलींना लग्नासाठी जोडीदार शोधताना महाराष्ट्रातील पालकांना मोठ्या अडचणी

मुंबई, 2 मार्च 2026 – महाराष्ट्राच्या अनेक घरांमध्ये एक मोठं संकट उभे आहे. मराठी समाजातले पालक, त्यांच्या प्रौढ मुलांची लग्न ठरवण्याच्या बाबतीत मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. पूर्वी अनेक समाज एकमेकांशी अनेक मार्गाने जोडलेले असायचे आणि त्यामुळे लग्न जमवणं सोपं काम होतं. मात्र, ते आता अपेक्षा, सामाजिक दबाव आणि आर्थिक अडथळ्यांच्या गुंतागुंतीच्या मार्गात रूपांतरित झालं आहे. 

शहरीकरण वाढत आहे आणि सांस्कृतिक रूढी बदलत आहेत आणि मुलींची सर्वाधिक पसंती मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांकडे वाढत आहे. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार शोधण्याची प्रक्रिया आता शिक्षण, जीवनशैली, शैक्षणिक आणि नोकरीच्या ध्येयांमुळे मोठ्या प्रमाणात वेळ घेणारी झाली आहे.

या मुद्याने अलीकडच्या वर्षांत खूप लक्ष वेधून घेतलं आहे, सोशल मीडियावरचे अनुभव आणि रिपोर्ट्स हे सांगतात की मराठी कुटुंबांमध्ये 'लग्नाची समस्या' दिवसेंदिवस वाढत आहे. तज्ज्ञ आणि अनेक सामाजिक संस्था सांगतात की, भविष्यात पालकांकडे ऑनलाईन मॅट्रिमोनी साईट्स शिवाय पर्याय शिल्लक नसेल. 

कारण, आता शहर ते गावखेड्यात मध्यस्थांची जवाबदारी कोणीही घेण्यास तयार नाहीत. अगदी डॉक्टर आणि इंजिनियर असण्याऱ्या मुला-मुलींना सुद्धा सहज स्थळं मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय, मग अशा परिस्थितीत कमी शिक्षण असलेल्यांनी नेमकं काय करावं असा प्रश्न उभा राहिला आहे.

ग्रामीण भागात ही समस्या अधिक गंभीर झाली आहे, कारण तिकडच्या ३०-४० वर्षांच्या अविवाहित पुरुषांना आर्थिक अस्थिरतेमुळे आणि जीवनशैली मुळे लग्नासाठी स्थळ मिळणं अत्यंत अवघड झालंय. तर शहरात राहणारी खूप उशिरा लग्न करण्याचा निर्णय घेतेय. शिक्षण पूर्ण करणं आणि त्यांनतर आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहण्याचा मुलींचा अधिक भर आहे. मात्र मुलांच्या करिअरच्या आकांक्षा आणि अपेक्षा पालकांना अजून अडचणीत आणत आहे. कारण वाढतं वय सुद्धा याच सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या मुलांना किंवा मुलींना लग्नासाठी स्थळं मिळवून देत नसल्याचं पाहायला मिळतंय.

मूलभूत मुद्दे आणि समस्या
या आव्हानामागे मुळात लग्नाच्या प्रक्रियेतील मुलामुलींच्या संख्येतही मोठी तफावत आहे. अनेक मराठी कुटुंबातील पालक सांगतात की ते लग्नासाठी मॅट्रिमोनी साइट्सवर नोंदणी करून ठेवतो, विविध समाजाच्या मेळाव्यांना हजेरी लावतो तसेच स्थानिक मध्यस्थांना देखील स्थळं शोधण्यास सांगतो, पण तरीही अडचणी थांबत नाहीत. त्यामुळे पालक आणि मुलांच्या बाबतीत, ही हताशा खूप स्पष्ट दिसते आहे. 

परिणामी, अनेक स्थळं आता हळूहळू इतर समाजातील स्थळांना देखील पसंती देत आहेत, मात्र ते प्रमाण अजूनही खूप कमी आहे. 2025 मध्ये मोठ्या चर्चेत आलेल्या एका प्रकरणात, महाराष्ट्रातील एका कुटुंबाने वराचा खराब क्रेडिट स्कोअर समजल्यावर शेवटच्या क्षणी लग्न रद्द केले होते आणि त्यातून लोकांसाठी आर्थिक स्थिरता अनिवार्य निकष बनला आहे.

मुलींसाठी सुद्धा समस्या अनेक पैलूंनी आहेत. विशेष म्हणजे पालक आर्थिक अनिश्चिततेमुळे मुलींच्या भविष्याची हमी म्हणून लग्न प्रक्रियेकडे पाहत आहेत. मात्र, सुशिक्षित शहरी मुलींसाठी समस्या म्हणजे त्यांच्या आर्थिक महत्वाकांक्षेशी जुळणारे जोडीदार मिळवणे आहे. तसेच अनेकांना त्यांच्या जात किंवा उपजातीतच लग्न करण्याचा दबाव पडतो, ज्यामुळे त्या पर्यायांच्या बाबतीत मर्यादित होतात. ग्रामीण महाराष्ट्रात हे आणखीच गंभीर आहे.

हवामान बदलामुळे आर्थिक अडचणीत अडकलेला शेतकरी, वाढलेली कर्जे आणि तरुणांकडे खात्रीशीर महिना कमाईचा मार्ग नसल्याने शेतकरी तरुणांना विवाहासाठी स्थळं मिळत नसल्याच दिसतंय. 

एकूण, शहरातील सुशिक्षित तरुण-तरुणी असो की ग्रामीण भागातील तरुण-तरुणी, विवाह सहज न जमण्याच्या अडचणींचा सामना करत आहेत. मात्र, यामध्ये पालकांची अडचण प्रचंड वाढताना दिसत आहे.     

लेख:
मराठी वधू वर सूचक डॉट कॉम
MarathiVadhuVarSuchak.com

Share this article

About the Author

Sachin Khot is an expert in marriage tips with years of experience helping individuals navigate their matrimonial journey. Their insights and guidance have helped countless people find meaningful relationships.

Ready to Start Your Journey?

Discover meaningful connections through our trusted Marathi matrimony platform built with the Marathi community's values at heart

Stay Updated with Latest Articles

Get notified when we publish new articles, tips, and success stories